विविध स्पर्धांतील ‘लेकरं’ अन् त्यांचे ‘हळवे’ पालक

0

परीक्षा असो, घटक चाचणी असो, क्रीडा स्पर्धा असो वा विविध स्पर्धा असो आजचे अतीमहत्त्वाकांक्षी ‘आईबाबा आपापले काम बाजूला सारुन लेकरांसाठी प्रचंड (?) वा अतोनात मेहनत घेतात खरं पाहिल तर ही गोष्ट लेकरांना प्रोत्साहन देणारी ‘पुढे व्हा सांगणारी व स्तुत्य आहे. पण लेकरांच्या एखाद्या -दुसर्‍या वेळेच्या अपयशाने त्यांच्या डोळ्यात जेव्हा पाणी येते, ‘वशिलेबाजी झाली’ असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा ते ‘हळवेपणा’ लेकरांच्या भल्याचे असते का हो? लेकरांसह रडणारे आईबाबा वा लेकरांसह झिंगाट नाचणारे आईबाबा जेव्हा मी विविध वाहिन्यांवर स्टेजवर बघतो तेव्हा मला त्या लेकरांची प्रचंड कीव येते, असे रडणे, नाचणे, बेभान होणे मुला-मुलींचे खरोखरच भले करणारे असते? प्रत्येक स्पर्धेत पहिला क्रमांक, प्रचंड यश लेकरं मिळवतील, हे मानणं कितपत योग्य म्हणायचं?

-अहो अवती भोवती दुनिया ही ‘स्वप्नांची दुनिया’ नाही तर ‘वास्तव दुनिया’ आहे व त्यात जय पराजय, पहिला-दुसरा हा ‘खेळ’ सुरू राहणारच हो! पण प्रश्‍नच तो हळव्या वा प्रचंड उत्साही पालकांचा परवा एका स्पर्धेसाठी मी प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. तिथे एका आजीशी मी बोलत होतो. नातवाच्या कौतुकासाठी त्या आल्या होत्या. नातवाला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं होतं. पण आजी तशा खुश होत्या. मला म्हणाल्या, ‘अहो भंडारी, पूर्वी असं नव्हतं, एवढं हळवेपण वा मस्ती नव्हती. सर्वांचे आईबाबा विशेषत: बाबालोक, आपल्या लेकरांच्या वागण्याबोलण्यासह प्रगतीकडे दुरून पण छानसं लक्ष ठेवून असायचे. प्रसंगी लक्षच नाहीये, हेही दाखववायचे. बाहेरुन माहिती काढत त्यावर नजरही ठेवायचे. त्यामागचे हेतू एकच. आपल्या लेकरांनी आयुष्याचे धडे (आपणच) व्यवस्थित गिरवावेत. समाजात कंस राहावं, बोलावं हे आपणच शिकावेत, ‘आज यश, उद्या अपयश’ हेही ते समजावून सांगयचे बरे! पंचवण्याची शक्ती दे वाढवायचे. सारखे अश्रू गाळत मुलांना दुबळ बनवत नसत ते कळल?’

-सतत पाळत ठेवणं, त्यांना शाळेसह विविध क्लासेससाठी पळवणं, ‘चांगल्या’ शिक्षणासाठी वारेमाप पैसा खर्च करणे, मानसिकदृष्ट्या त्यांना दुबळं करणं , हे सारं आजच्या जागरुक पालकांनी खरंच (थोडंतरी) पाळायला हवंय. संस्कृतात एक छान सुभाषित आहे. ‘लालयेत पंच वर्षानि, दशवर्षानि ताडयेत, प्राप्तेतु षोडशेवर्षे पुत्रमित्रवदाचरेत’ याचा अर्थ आहे. पाच वर्षांपर्यंत लाड करायचे त्यानंतरची दहा वर्षे त्याला कडक शिस्तपालन करायला लावायचे आणि त्याला सोळावे वर्ष लागताच त्याला आपल्या मित्राचा दर्जा द्यायचा म्हणजे बरोबरीच्या नात्याने वागवायचे. त्यांच्याशी सतत सर्वांनी ‘संवाद’ साधन, त्यांचे विचार ऐकून घेत, त्याला घरासह व्यवहाराजवळ आणायचे त्यांच्या विविध मतांचा आदर करत कुटुंबातील महत्त्वाची ‘व्यक्ती’ मानायचे त्याला ‘सबपर्सन’ (दुय्यम व्यक्ती) म्हणून न वागवता सन्मानाचे वागवायचे असो.

शेवटी एक किस्सा जो मी जवळून अनुभवला ज्या लेकराला तृतीय बक्षीस मिळाले होते (रुपये 501, प्रशस्तीपत्रक व पुस्तक वैगरे) तो बक्षीस घेऊन जागेवर गेला आई वडिलांनी बक्षीस बघितलं तर नाही वा अभिनंदनही केल नाही उलट ते त्याला म्हणाले, ‘असाच बावळपणा करुन प्रत्येक वेळी मुर्खासारखी बक्षीसं घालवतोस. आजपासून स्पर्धा बंद! ‘मी ते सारं शांतपणे’ ‘बघत’ होतो. कुणाशी कसं बोलावं हे मला कळत नव्हतं मी शांतपणे हॉलबाहेर निघत मुलांवर सतत ‘पाळत’ ठेवणार्‍यां आईबाबांवर वैतागत होतो, फुकटचा!

चंद्रकांत भंडारी – 9890476538