विवेकानंद नगरात अतिक्रमणांवरुन वाद

0

जळगाव । विवेकानंद शाळा क्र 45 समोर सकाळी 11. 00 वाजता महापालिकेच्या वतीने अतिक्रमणाची कार्यवाही करण्यात आली. यावर बोध्द वस्तीत राहणार्‍या नागरिकांनी मोठा विरोध केल्याने कार्यवाहीस अडथळ निर्माण झाला होता. विरोध करणार्‍या समाजविरोधकांनी कार्यवाही साठी गुप्त माहिती दिल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला.

निवेदनात कार्यवाहीची मागणी
विवेकानंद नगरातील बोधावस्ती शेजारी डॉ बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा एक चबुतरा निर्माण करून ठेवण्यात आल्या होत्या याठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. मात्र काही समाज कंटकानी मनपा अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून 19 मे शुक्रवार रोजी पूर्व सूचना न देता अतिक्रमणाची कार्यवाही करण्यात आली. तरी सबंधित अधिकारी आणि कर्मचारी तसेच सबंधिता वर गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.