विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

0

गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घेतले दत्तक

पिंपरी- स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंसह गणवेशाचे वाटप करण्यात आले. याशिवाय चार गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले असून त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी घेण्यात आली आहे. चिखली, शरदनगर येथील वीर हनुमान मंदिरामध्ये रविवारी (दि.15) हा कार्यक्रम झाला. यावेळी महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार, क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे, बाजीराव सातपुते, देवराम मेदनकर, भालचंद्र सोहनी, उद्योजक प्रवीण पाटील, नागेश शेट्टी, प्रतिष्ठानचे विश्‍वस्त रामराजे बेंबडे, महेश मांडवकर, बापूराव साळुंखे, सुनिल खंडाळकर, सिद्राम मालगत्ती, संजय ढंगारे, मंगेश पांडे, दिलीप खंडाळकर, शंकरराव बनकर, जयसिंग भोसले, शंकर मालगत्ती, हंबिराव भिसे आदी उपस्थित होते.

20 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
दहावीतील 64 आणि बारावीतील 21 विद्यार्थ्यांचा प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. त्यांना टिफिन बॉक्स बक्षिस देण्यात आले. तसेच आर्थिकदृष्टया गरीब असलेल्या 20 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. चार विद्यार्थ्यांना दत्तक घेवून वार्षिक शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली आहे. यावेळी प्रसिद्ध निवेदक दत्तात्रय तरटे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. श्रमश्री बाजीराव सातपुते यांचे ‘थोरांच्या पाऊलखुणा’ हे पुस्तक सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आले. सातपुते यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मिलिंद वेल्हाळ यांनी केले. तर, संतोष ठाकुर यांनी आभार मानले.