जळगाव: विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुलांना अभ्यास व दैनंदिन कामाच्या ताणातून मोकळीक मिळावी, तसेच विरंगुळा वाटावा या दृष्टीने ‘कठपुतली नृत्य’ हा कार्यक्रम झाला. यात विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात अाले.
चोपडा येथील प्रसिद्ध कठपुतली नर्तक दिनेश साळुंखे यांनी या शोमध्ये सुरुवातीला लहानग्या मुलांसाठी प्राणी, पक्षी यांच्या बाहुल्यांद्वारे खेळ दाखवला तर मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पपेट थिएटरची निर्मिती करून प्रत्यक्ष कार्य संचलन करून पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा’, शैक्षणिक, हुंडा नको या सारख्या ज्वलंत विषयांवर बाहुली नृत्यातून वाचा फोडत कठपुतलीचे नृत्य सादर केले. या वेळी ज्ञानेश्वर पाटील, संध्या देशमुख उपस्थित होते. दीपाली बडगुजर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमासाठी प्राचार्य पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.