विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुल येथे गणेश उत्सवाच्या निमित्ताने अथर्वशिर्ष पठन व निबंध स्पर्धेचे आयोजन

0

जळगाव: विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने अथर्वशिर्ष पठन व निबंध स्पर्धा पार पडल्या. विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कुल येथे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादीत न ठेवता त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचा विकास व्हावा यादृष्टीने विविध स्पर्धा घेतल्या जातात. याचदृष्टीने अथर्वशिर्ष पठन व निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचे ज्ञान वाढावे व त्यासोबतच गणपती अथर्वशिर्ष पठनाने होणारी मनाची एकाग्रता व इतर अनेक फायदे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. निलश्री सहजे यांनी काम पाहिले तर स्पर्धेचे नियोजन हर्षदा उपासनी यांनी केले.

त्याचप्रमाणे यादिवशी निबंध स्पर्धाही घेण्यात आली या स्पर्धेमध्ये जवळ-पास ६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेच्यामाध्यमातून विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यास मदत होईल तसेच इंग्रजी भाषेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण कारणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता. या स्पर्धेचे नियोजनव परीक्षण श्री. निलेश चौधरी यांनी केले. या दोन्ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या. यामध्ये पहिला गट इ. ५ वी ते ७ वी व दुसरा गट इ. ८ वी ते १० वी अशा पध्दतीने गट तयार करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर पाटील, समन्वयक श्री. गणेश लोखंडे यांचे मार्गदर्शन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.