चोपडा – येथील विवेकानंद विद्यालयात मातृतुल्य, मातृहृदयी साने गुरुजी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे, उपशिक्षिका राजेश्वरी भालेराव, अनिल शिंपी, संदीप कुळकर्णी यांच्या शुभहस्ते सानेगुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी खरा तो एकची धर्म हे गीत गाऊन त्यांना विनम्र अभिवादन केले. विद्यार्थ्यांना साने गुरुजी यांच्या विषयी साध्या-सोप्या भाषेत विद्यालयाच्या उपशिक्षिका राजेश्वरी भालेराव यांनी माहिती सांगितली.
ग्राहक दिनानिमित्त जनजागृती
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थी निल मकरंद केंगे याने छानशी गोष्ट सांगीतली. तसेच विद्यालयाचे उपशिक्षक जावेद तडवी यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना ग्राहक व त्यांचे हक्क याविषयी साध्या सोप्या भाषेत माहिती सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार उपशिक्षक जावेद तडवी यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.