रावेर- विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र राज्य धोबी समाजाचे प्रदेशाध्यक्ष व जनसंग्राम बहुजन लोकमंचचे संस्थापक विवेक ठाकरे यांनी उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून दावेदारी केली आहे. वंचित आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीचा आढावा व आगामी विधानसभेची रणनीती ठरविण्यासाठी चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले. भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत वंचित आघाडीकडून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांना बायोडाटा घेऊन बोलविण्यात आले होते. यावेळी निंभोरा येथील माजी उपसरपंच व राज्य ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी बैठकीत आपल्या समर्थकांसह उपस्थिती देत आपल्या सामाजिक-राजकीय व इतर सर्वकष कामगिरीच्या गोषव-यासह पक्षाचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांना रावेर विधानसभेसाठी उमेदवारीसाठी विनंती प्रस्ताव सादर केला.
यांची होती उपस्थिती
जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी प्रस्ताव स्विकारला. यावेळी वाय.डी.पाटील, शरद चौधरी,
साहेबराव येवले, योगेश नन्नवरे, हितेश रायपूकर हे उपस्थित होते. बैठकीला जिल्हा नेते सुदाम सोनवणे, महेश तायडे, युवा तालुकाध्यक्ष नितीन अवसरमल, राजेश रायमाळे, राजकुमार इंगळे, संजय हिरोळे, मनोहर कोळी, रफिक बेग, आकाश तायडे, महेंद्र तायडे, शरद चौधरी, चेतन भालेराव, सुनील कोंघे, उमेश सुवरणे, सलीम शाह, युवराज गाढे, सुरेश अटकाळे आदी उपस्थित होते.