अमळनेर । येथील रहिवासी तथा आयआयटी इंजिनिअर विवेक भासकर बोरसे यांनी आपल्या मेडिकल टेक्नॉलॉजी या विषयावरील संशोधनाचे दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात उत्कृष्ट सादरीकरण करुन अमळनेरचे नावलौकिक वाढवीले आहे. विवेक बोरसे यांच्या संशोधनाची राष्ट्रपती भवन येथे होणार्या इनोव्हेशन्स इन मेडिकल सायन्य अॅण्ड बायोटेक्नॉलॉजी प्रदर्शनासाठी निवड झाली होती. यासाठी संपूर्ण भारतातून 500 हून प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्यातून 45 मेडिकल टेक्नॉलॉजीस 9 मार्च रोजी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या कार्यक्रमात सादर झाल्या. यामध्ये विवेक बोरसे याचे सादरीकरण उत्कृष्ट ठरले. विवेक बोरसे हे सध्या आयआयटी बॉम्बे पवई येथे मेडिकल इंजिनिअरींग विषयात पीएचडी करीत आहेत. बी.एस.एन.एल.कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष भास्कर बोरसे यांचा मुलगा आहे.