नवी दिल्ली । देशातील नागरीकांना आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणुक ओळखपत्र आदींचे महत्व पटले असून नुकतेच पॅनकार्डला 1 जुलैच्या पूर्वी आधारबरोबर सलग्न करण्यात आले नाही, तर नागरिकांचे पॅनकार्ड रद्द करण्यात येणार नाही असे प्राप्तिकर विभागाकडून सांगण्यात आले. 30 जूनपर्यंत पॅनकार्डला आधारकार्डबरोबर जोडण्यात न आल्यास पॅनकार्ड रद्द करण्यात येईल असे सांगण्यात येत होते. मात्र अशा अफवांवर केंद्रीय प्रत्यक्ष कर महामंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आल्याने शंकेचे निरसन झाले आहे. विशिष्ट तारखेनंतर आधार – पॅनकार्ड जोडणी आवश्यकच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवर आधार आणि पॅनकार्डची जोडणी करता येईल. यामध्ये पॅन, आधार आणि आधारवरील नाव ही माहिती योग्य प्रकारे देणे गरजेचे आहे. जे आधार कार्ड पॅनकार्डबरोबर जोडण्यात येणार नाहीत, ते रद्द करण्यात येणार नाही असे प्राप्तिकर विभागाने सांगितले. पॅनबरोबर आधार जोडणीसाठी एक तारीख निश्चित करण्यात येईल. जोडणी करण्यात न आल्यास पॅन रद्द होईल, असे सीबीडीटीचे प्रमुख सुशील चंद्रांंनी सांगितले.