लोणावळा : शहर पोलिसांनी विशेष कारवाई व वाहन तपासणी मोहिमे राबविल्याने लोणावळेकरांना चांगलीच धडकी भरली आहे. यातून मोठ्या प्रमाणात दंड तर वसूल झालाच त्यासह मद्य प्राशन करून वाहन चालविणार्यांवर खटलाही दाखल झाले आहेत. यात विना परवाना वाहन चालविणे, अल्पवरीन मुले, राँग साईडने वाहन चालविणे, हेल्मेट नसणे अशांवर कारवाई करण्रात आली.
यावेळी मोठ्या प्रमाणात वाहनचालक विना लारसन्स गाडी चालविताना तसेच अल्पवरीन मुले दुचाकी चालविताना आढळून येत आहेत. मुलांनी अपघात केल्यास गाडीमालकावर गुन्हा दाखल होण्याचा नवा कायदा पास झालेला असताना त्याला पायदळी तुडवतांना बालक व पालक दिसत आहेत.