विशेष कार्यकारी अधिकार्‍यांचे अहवाल पाठविण्याची मागणी

0

भुसावळ। नगरपालिका निवडणूक आटोपल्यानंतर शहरात एकूण 49 नगरसेवक निवडून आले आहे. परंतु पालिकेने प्रस्ताव न पाठविल्याने हे नगरसेवक विशेष कार्यकारी अधिकारी या पदापासून वंचित आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या योजनांसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पुर्तता करण्यास अडचणी येत असल्याने पालिका प्रशासनाने हे प्रस्ताव लवकरात लवकर पाठविण्याची मागणी आरपीआय गवई गटातर्फे करण्यात आली आहे.

यासंदर्भात जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर यांना निवेदन दिले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी नगरपालिकांना यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे पत्र दिले आहे. त्यात भुसावळ पालिकेचाही समावेश असून जिल्ह्यातील अनेक नगरसेवकांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून या पदाचा अधिकार देण्यात आला आहे. निवडणुकीस पाच महिन्यांचा कालावधी उलटूनसुध्दा प्रस्ताव पाठविले गेले नाही. त्यामुळे आठ दिवसांच्या आत अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे न पाठविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.