विशेष रेल्वे गाड्यांचे चार महिने आधी करता येणार आरक्षण

0

भुसावळ : रेल मंत्रालयाद्वारा चालविण्यात येणार असलेल्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षणात 31 मे पासून बदल करण्यात आला आहे. विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण आता 120 दिवस आधी करता येणार असून यापूर्वी केवळ एक महिना पहिले आरक्षण करता येत होते. 31 मे पासून सकाळी आठ वाजता अग्रीम आरक्षण 120 दिवस आधी करता येणार आहे शिवाय या गाड्यांमध्ये पार्सल आणि लगेज बुक करण्याची सुविधा देखील 31 मे पासून करता येणार आहे.