विशेष स्थायी सभेत कमी दराच्या निविदाधारकांवर चर्चेसाठी

0

जळगाव । केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने अंतर्गत शहराच्या पाणी पुरवठा योजनेचा मक्तेदार कमी दराची निविदा प्राप्त झालेली असून त्या निविदेवर चर्चा करण्यासाठी विशेष स्थायी सभेचे आयोजन शुक्रवार 3 मार्च रोजी करण्यात आले आहे. अमृत योजनेच्या कामाच्या निविदा 3 मक्तेदारांनी प्रतिसाद दिलेला आहे.

यात जैन इरीगेशन सिस्टीम लि, लक्ष्मी सिव्हील इंजिनियरिंग सर्वीसेस प्रा. लि. कोल्हापुर व औरंगाबाद येथील संतोष कन्स्ट्रक्शन इन्फ्रा प्रा. लि. व विजय कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांच्या ज्वाइंट व्हेंचर यांचा समावेश होता. यातील संतोष कन्स्ट्रक्शन इन्फ्रा प्रा. लि. व विजय कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यांच्या ज्वाइंट व्हेंचरची भरलेल्या निविदा किमतीच्या 4.34 टक्के कमी दराची निविदा प्राप्त झाल्याने त्यांची निविदा स्वीकारण्यात यावी असा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी सभेसमोर ठेवला आहे. यावर प्रभारी शहर अभियंता यांनी ज्वाइंट व्हेंचर यांची निविदा सर्वात कमी असल्याने स्वीकारण्यास हरकत नाही असा अभिप्राय या प्रस्तावावर दिला आहे.