विश्रांतवाडी । विश्रांतवाडी स्मशानभुमीतील गॅस शवदाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी 28 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार असल्याचे, पुणे महापालिकेने कळविले आहे. विश्रांतवाडी स्माशानभूमीत पालिकेच्या वतीने गॅस शवदाहिनी बसविण्यात आली आहे. या शवदाहिनीची अंतर्गत दुरुस्ती व विटा बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवार (5 ऑगस्ट) पर्यंत ही शवदाहिनी बंद ठेवण्यात आली आहे. दुरुस्तीच्या कामाला आठ दिवस लागणार आहेत. दरम्यान, अन्य सुविधा उपलब्ध राहणार असून स्मशानभूमीतील एअर पोल्युशन कंट्रोल सिस्टीमद्वारे शवदहन सुरू राहणार आहे.