रावेर : तालुक्यातील विश्रामजीन्सीत येथे घराच्या बाजुला बांधलेल्या पारडी वर अस्वलाने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला. शनिवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेने पशूपालकांमध्ये भीती पसरली.
पहाटेच्या सुमारास केला हल्ला
विश्रामजीन्सी येथे राजेंद्र पद्मसिंग पवार यांच्या घराच्या बाजुला पारडी बांधली आली असता शनिवारी पहाटेच्या सुमारास अस्वलाने हल्ला चढवल्याने पारडीचा मृत्यू झाला. वनपाल अतुल तायडे घटनास्थळी जाऊन पगमार्ग बघितले असता हल्ला करणारा प्राणी अस्वल असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान पशुधन पर्यवेक्षक डॉ.के.डी.बाविस्कर, पोलिस पाटील गोकुळ पवार यांच्या सक्षम पंचनामा करण्यात आला.