विश्वविजेत्यांची आज भुसावळमध्ये भव्य रॅली

0

भुसावळ। विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यावसायीक संघटनांतर्फे विश्वविजयी विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीचे स्वागत शनिवार, 26 रोजी दुपारी दोन वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे संगीता देशमुख व सिद्धीविनायक फाउंडेशनतर्फे होईल.

गांधी पुतळ्याजवळ श्री रामराज्य फाउंडेशन, पंचायत समितीजवळ समाज सेवक केशव बारसू महाजन संस्था, प्रांत कार्यालयजवळ साई क्रीडा संस्था, वसंत टॉकीजजवळ स्नेहयात्री प्रतिष्ठान, हंबडीकर चौकात सोनी ठाकुर व मित्र मंडळ, बाजार पेठ पोलीस स्टेशनजवळ बबलू बर्‍हाटे व मित्र मंडळ, अहिल्यादेवी विद्यालय, गंगाराम प्लॉटजवळ, नितिन धांडे, म्युन्सिपल हायस्कूल आदी विविध ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे.