जळगाव। महाराष्ट्रीयन उद्योजक व व्यावसायिकांनी विश्वासार्हता हाच ट्रेडमार्क बनविण्याची गरज आहे असे बांधकाम व्यावसायिक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत अमळकर यांनी प्रतिपादन केले. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या जळगाव चॅप्टरच्या 11 वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष श्रीधर इनामदार व मानद सचिव विनीत जोशी यांची उपस्थिती होती.
1981 मध्ये उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमामुळे जीवनात टर्निंग पॉईट आला आणि शासकीय नोकरी सोडण्याचा निर्णय योग्य ठरला असे अमळकर यांनी सांगून व्यावसायिक वाटचाली विषयी माहिती दिली. कुंटूंबात उद्योगाविषयी संवाद असला पाहिजे. नाही तर आनंद व तणाव यांची दरी निर्माण होते. कुंटूंबातील सदस्यांना व्यवसायातील काही जबाबदर्या द्याव्या. मुलांना जीवन विषयक व्यवहाराचा दृष्टीकोन शिकवा असे त्यांनी आवाहन केले. उद्योगात नफा-तोटा, यश-अपयश येतच असते अडचणी सगळ्यांनाच येतात. मात्र चांगल्या मार्गाने परिश्रमातूनच पैसा कमवावा असे शेवटी अमळकर यांनी सांगितले. सूत्रसंचालन विनीत जोशी यांनी तर आभार श्रीधर इनामदार यांनी मानले.