नवी दिल्ली-मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. उद्या मोदी सरकारला विश्वास प्रस्ताव जीकावे लागणार आहे. दरम्यान शिवसेना भाजपात मतभेत असले तरी अविश्वास प्रस्तावात शिवसेनेने भाजपाची साथ देत मित्र धर्म निभावला. शिवसेनेने पक्षाच्या खासदारांना व्हिपही जारी केला असून अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केल्याचे वृत्त आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात वेळोवेळी नाराजी व्यक्त करणारी शिवसेना विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाच्या मतदानाच्या वेळी मोदी सरकारच्या बाजूने उभी राहणार का, याची उत्सुकता निर्माण झाली होती. तेलगू देसम पक्षाने अविश्वास प्रस्तावासाठी पुढाकार घेतला आहे. शिवसेना खासदाराला विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली होती. त्यावेळी तेलगू देसम पक्षाचे खासदार केंद्रीय हवाई नागरी मंत्रीपदी होते. या प्रकरणात तेलगू देसमने शिवसेनेला अपेक्षित साथ दिली नव्हती. यामुळे शिवसेना तेलगू देसमवर नाराज आहे. तसेच भाजपाकडे २७३ चा बहुमताचा आकडा असल्याने शिवसेनेने अविश्वास दर्शक प्रस्तावाविरोधात भाजपाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.