विश्वेश्वर बँकेच्या अध्यक्षपदी अनिल गाडवे

0

पुणे। दि विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड या मल्टिस्टेट बँकेच्या वर्ष 2017-18 कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यासाठी संचालक मंडळाची सभा नुकतीच बँकेच्या मुख्य कार्यालयात अ‍ॅड. शशिकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अनिल गाडवे यांची अध्यक्षपदी आणि राजेंद्र मिरजे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चिंतामणी वैजापूरकर उपस्थित होते. गाडवे काका हलवाई फर्मचे भागीदार असून मिरजे उद्योजक आहेत.