विश्‍वकरंडक इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत दीपिकाला ब्राँझपदक!

0

बँकॉक । विश्‍वकरंडक इनडोअर तिरंदाजीच्या दुसर्‍या टप्प्याच्या स्पर्धेत दीपिका कुमारीने ब्राँझपदक पटकावले. दीपिका वगळता या स्पर्धेत सोडल्यास भारताची पाटी कोरीच राहिली. बँकॉकला झालेल्या या स्पर्धेत अतानू दास दुसर्‍याच फेरीत पराजित झाला. तिसरे मानांकन मिळवलेल्या दीपिकाने ब्राँझपदकाच्या लढतीत रशियाच्या सयाना त्स्येम्पिलोवा हिला 7-3 असे हरवले. पहिला सेट 29-29 असा बरोबरीत सुटल्यावर दीपिकाने त्यानंतरचे दोन सेट 30-27 या फरकानेच जिंकले. त्यानंतरचा सेट 28-29 गमावला, पण अखेरचा पाचवा सेट 30-28 जिंकत ब्राँझ निश्‍चित केले. दीपिकाची या स्पर्धेतील लढती भारतीयांविरुद्धच झाल्या.

तिने निवेता गणेशनला 6-0, लैशराम बॉम्बयला देवी हिला 7-3 आणि अंकिता भकत हिला 6 -2 असे नमवले. तिला उपांत्य फेरीत कोरियाच्या किम सुरीन हिने 5-5 बरोबरीनंतर शूटऑफवर 10-9 असे हरवले.