नवी दिल्ली । भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सारखा खेळाडू सध्याला क्रिकेट मैदानावर दुसरा कोणीच नाही.तो लंबी रेस का घोडा असल्याचे मत न्यूझीलंडचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंगने भविष्यवाणी केली आहे.याचबरोबर धोनीच्या क्षमतेचे कौतूक करत आगामी विश्वचषकापुर्वी त्याचे करिअर संपणार असे भाकित ही केले आहे.
वयाच्या 38 व्या वर्षी धोनी 2019 विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवू शकेल, असे फ्लेमिंगने म्हटले आहे. वैयक्तिक आयुष्य आणि क्रिकेट यामध्ये धोनीने चांगले संतुलन राखले आहे. त्याला याचा निश्चित फायदा होईल. संघात स्थान कायम राखायचे असेल तर चांगल्या खेळाचे प्रदर्शन करावे लागेल, हे धोनीला चांगलेच ठाऊक आहे.