रांची। माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कसोटी क्रिकेटातून निवृती व कर्णधार पद सोडले असले तरी खेळ अजुन संपला नही आहे. याची जाणीव करून देत महेंद्रसिंग धोनी म्हणाला की, विश्वचषकाल दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असला तरी मी सहजपणे खेळेले.कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनीने स्थानिक क्रिकेट सामन्यांत सहभागी होऊन आपले फीटनेस जपले आहे.असे उत्तर देवून निवृत्तीबाबत तर्कवितर्क लढविणार्याचेही धोनीने या बोलातून तोड बंद केले.
विजय हजारे करंकडात झारखंड संघाने धोनीच्या नेतृत्त्व उपांत्य फेरी गाठली होती. कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनीने स्थानिक क्रिकेट सामन्यांत सहभागी होऊन आपले फीटनेस जपले आहे. नुकतेच धोनीने एका कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी धोनीला त्याच्या फिटनेस आणि पुढे आणखी किती काळ देशाकडून खेळण्याचा मानस आहे याबाबत विचारण्यात आले.क्रिकेटमधून केव्हा निवृत्ती घ्यावी लागेल याचा अंदाज आपण केव्हाच ठरवू शकत नाही. एखादी मोठी दुखापत देखील खेळाडूला निवृत्ती घेण्यास भाग पाडू शकते. पण सध्याच्या परिस्थितीनुसार मी पुढील वर्ल्डक्प देखील सहज खेळू शकेन, असे धोनी म्हणाला.
वर्ल्डकपसाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. या दोन वर्षांत काय होईल हे सांगता येत नाही. याशिवाय, संघाच्या वेळापत्रकावरही पुढची रणनिती ठरते. तुम्ही जेव्हा दहा वर्ष सतत क्रिकेट खेळता तेव्हा तूम्ही एका ‘विंटेज कार’ सारखे होता. तुम्हाला तुमच्या शरिराकडे जास्त लक्ष द्यावे लागते, असेही धोनी पुढे म्हणाला. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाचे कसोटी दौरे सुरू असल्याने धोनीला राष्ट्रीय संघातून आराम मिळाला होता.