नवी दिल्ली । 2019 साली होणार्रा वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान व वेस्ट इंडिजचे संघ थेट पात्र ठरण्रात अपरशी ठरले आहेत. आठव्रा व नवव्रा क्रमांकावर राहिल्राने दोन्ही संघांना विश्वचषकासाठी थेट पात्र होता आले नाही. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, भारत, श्रीलंका, न्रूझीलंड, बांगलादेश व ऑस्ट्रेलिरा हे संघ विश्वचषक स्पर्धेला थेट पात्र ठरले आहेत.
आता पाकिस्तान व वेस्ट इंडिजला विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवण्रासाठी पात्रता स्पर्धेच्रा दिव्रातून जावे लागणार आहे. अलीकडेच विंडीज व पाक मालिका पाकने 2-1 अशा फरकाने जिंकली. मात्र, रा विजरामुळे पाकच्रा क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही. पाकने ही मालिका 3-0 फरकाने जिंकली असती तर पाक संघ विश्वचषकासाठी थेट पात्र ठरला असता. विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र संघांची क्रमवारी ठरवण्रासाठी संघाची 1 मे 2014 ते 1 मे 2017 रा कालावधीतील कामगिरी विचारात घेण्रात आली आहे.