विश्‍वविजेता संघ होणार अब्जाधीश

0

नवी दिल्ली । फुटबॉलचे महायुद्ध मानली जाणारी फिफा विश्‍वचषक स्पर्धा दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. जगभरातील 32 मातब्बर संघ सोनेरी विश्‍वचषकासाठी एकमेकांशी झुंजणार आहेत. कोण जिंकणार याबाबत तर्क-वितर्क लावणे आत्तापासूनच सुरू झाले आहे. कोणता संघ किती मजबूत आहे, कोणत्या संघात काय उणिवा आहेत, सर्वोत्कृष्ठ खेळाडू कोण?… अशा अनेक गोष्टींच्या चर्चांना उधाण आले आहे. या सर्व चर्चा सुरू असताना स्पर्धेच्या बक्षिसांची एकूण रक्कम कळल्यास तुम्हाला नक्कीच किक बसल्याशिवाय राहणार नाही. विश्‍वचषकाला रशियात 14 जूनपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या फिफा विश्‍वचषक विजेत्या संघाला 18 कॅरेट सोन्याच्या चषकासोबतच 225 कोटी रुपयांचा रोख पुरस्कार मिळणार आहे. विश्‍वचषकातील बक्षिसाची एकूण रक्कम 79 कोटी 10 लाख डॉलर (53 अब्ज रुपयांहून अधिक) इतकी असेल. स्पर्धेतील उपविजेत्याला 194.4 कोटी रुपये मिळतील. तिसर्‍या स्थानावरील संघाला 160.1 कोटी दिले जातील. फिफा विश्‍वचषकात सहभागी होण्यासाठी खेळाडूंना मोकळे करणार्‍या फुटबॉल क्लब्सना 20 कोटी 9 लाख डॉलर दिले जातील. विश्‍वचषकादरम्यान खेळाडू जखमी होऊन काही नुकसान झाल्यास भरपाई म्हणून 13 कोटी 40 लाख डॉलरची रक्कम क्लब सुरक्षा कार्यक्रमाला दिली जाईल. या स्पर्धेत खेळाडूंवरही पुरस्कारांचा वर्षाव होणार आहे. विश्‍वचषक स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्वच 32 संघांना पूर्वतयारीसाठी प्रत्येकी 15 लाख डॉलर देण्यात आले आहेत. स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडणार्‍या प्रत्येक संघाला 80 लाख डॉलर, तर अंतिम 16 मधून बाहेर पडणार्‍या संघांना प्रत्येकी 1 कोटी 20 लाख डॉलरची रक्कम मिळेल. उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होणार्‍या संघाना 1 कोटी 60 लाख आणि चौथ्या स्थानी राहणार्‍या संघाला 2 कोटी 20 लाख डॉलरचे बक्षीस प्रदान करण्यात येईल.

रशियात रंगणार्‍या फिफा विश्‍वचषकाची अतिरिक्त तिकिटे उपलब्ध होताच अवघ्या तासाभरात एक लाख 20 हजार तिकिटांची विक्री झाली आहे. आता काही निवडक सामन्यांची अतिरिक्त तिकिटे शिल्लक असल्याची माहिती आयोजकांनी दिली. फुटबॉल चाहत्यांना तिकिटांची उपलब्धता फिफा डॉट कॉम आणि तिकीट वेबसाईटवर दिली जात असून तिकिटे 15 जुलैपर्यंत उपलब्ध असतील. फिफा विश्‍वचषकाच्या तिकीटविक्रीला सुरुवात झाल्यापासून जगभरात आतापर्यंत 25 लाखांवर तिकिटे विकली गेली आहेत. ज्यांना तिकिटे मिळाली नाहीत त्यांनीही आशा सोडू नये. वेबसाईटकडे लक्ष ठेवल्यास अतिरिक्त तिकिटे उपलब्ध होऊ शकतात, असे आयोजकांचे मत आहे. तिकीट मिळविणार्‍या चाहत्यांना सामना पाहायचा नसल्यास त्यांनी वेबसाईटच्या माध्यमातून तिकिटे विकावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या सामन्यांची तिकिटे सध्या उपलब्ध नाहीत, ती नंतरही उपलब्ध होऊ शकतात. फिफा डॉट कॉमच्या माध्यमातून आधी तिकीट मिळविणारे चाहते आपली तिकिटे इतरांना विकू शकतात. फिफा विश्‍वचषकाच्या तिकीटविक्रीसाठी फिफा डॉट कॉम आणि तिकीट्स हीच एकमेव अधिकृत वेबसाईट आहे. फिफा विश्‍वचषकाची अवैध विक्री झाल्याचे आढळून आल्यास त्याला आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना सावध करण्यात आले आहे.

88 वर्षांपासून होतोय बॉलमध्ये बदल
14 जून से 15 जुलैदरम्यान रशियात खेळल्या जाणार्‍या फिफा विश्‍वचषकात एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यावेळी स्पर्धेत वापरण्यात येणार्‍या बॉलमध्ये चीप लावण्यात येणार आहे. त्या चीपला मोबाइल फोन कनेक्ट करता येईल. या आधीही अनेकवेळा फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. पहिल्या विश्‍वचषकापासून ते 2018 च्या फिफा विश्‍वचषकापर्यत प्रत्येकवेळी बॉलमध्ये बदल करण्यात आले आहेत. उरुग्वेमध्ये झालेल्या 1930 च्या पहिल्या विश्‍वचषकात 12 तुकड्यांपासून बनवलेल्या बॉलचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर प्रत्येकवेळी बॉलमध्ये योग्य ते बदल करण्यात आले. त्यावेळी बॉलवरुन अर्जेंटिना और उरुग्वे या दोन संघात वाद झाला होता.
1938 चा दुसरा विश्‍वचषक फ्रान्समध्ये खेळवण्यात आला होता. या विश्‍वचषकातही 12 तुकड्यांपासून
बनवलेल्या बॉलचाच वापर करण्यात आला. परंतू, बॉलचा रंग बदलून तपकिरी करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या महायुद्धामुळे दोनवेळा विश्‍वचषकाचे आयोजन करण्यात आले नाही. 1950 चा विश्‍वचषक ब्राझीलमध्ये झाला. यावेळी बॉलच्या शिलाईवर कमी जोर पडेल, असा बॉल बनवण्यात आला
होता. 1954 चा विश्‍वचषक स्वित्झर्लंडमध्ये खेळवण्यात
आला. यावेळी 18 तुकड्यांचा बॉल वापरण्यात आला. या प्रकारच्या बॉलचा वापर 1966 च्या विश्‍वचषकापर्यंत होत
राहिला. चिलीमध्ये झालेल्या 1966 च्या विश्‍वचषकात बॉलद्वारे पाणी शोषूण घेणे, उन्हात बॉलचा रंग बदलने अनेक तक्रारी आल्या. त्यानंतर त्यात योग्य ते बदल रेफरी कडून सांगण्यात आले.
1970 साली मॅक्सिको येथे झालेल्या विश्‍वचषक स्पर्धेआधी फुटबॉल खेळाची जागतिक पालक संघटना फिफा और आदिदास कंपनीत एक करार करण्यात आला. तेव्हा विश्‍वचषकात वापरण्यात येणार्‍या बॉलचे नाव टेलस्टार असे ठेवण्यात आले. अर्जेंटिनामध्ये झालेल्या 1978 च्या विश्‍वचषकात आदिदासने बॉलला टॅगो हे नाव दिले. तेव्हा पहिल्यांदाच आदिदासने आपला ट्रेडमार्क बॉलवर दिला होता. 2010 च्या दक्षिण अफ्रिकेत झालेल्या विश्‍वचषकात आदिदासची सहयोगी कंपनी जबुलानीने 11 वा आदिदासचा बॉल तयार केला. 11 रंगाचा वापर करून हा बॉल बनवण्यात आला होता.