शिक्रापूर । शिक्रापूर येथे विश्वव्यापी जनविकास परिषद यांच्या वतीने दहा वर्षापासून सर्वधर्म सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जात आहे. या वर्षी देखील येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत 101 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा नुकताच पार पडला मंगल वातावरणात सोहळा साजरा झाला याप्रसंगी आमदार बाबुराव पाचर्णे, माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, सरपंच जयश्री भुजबळ, माजी सरपंच अंजना भुजबळ, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, युवानेते रोहित खैरे, बाळासाहेब लांडे, राजेंद्र गावडे, डॉ. मच्छिंद्र गायकवाड, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रवीणकुमार शर्मा, समता परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, पुणे प्रादेशिक बाजार समीतीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, निमगाव म्हाळुंगीचे उपसरपंच कानिफ गव्हाणे, आरपीआयचे शिरूर तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, राजेश धुमाळ, बाबासाहेब सासवडे, संजय केवटे, उद्योजक संजय भुजबळ यांसह आदी मान्यवर, ग्रामस्थ तसेच वर्हाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजकांच्या वतीने सर्व वधूवरांना स्वतंत्र खोल्या आहेत तसेच सर्व वधू वर व मामांना एक सारखा पोशाख, फेटे देण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ भुजबळ यांनी केले तर प्रास्ताविक आयोजक सुरेश भुजबळ यांनी केले. तर प्राचार्य रामदास थिटे यांनी यावेळी आभार मानले.
सामुदायिक विवाहसोहळ्याचा सर्वसामान्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी यामध्ये सहभाग घेतला आणि विवाहसोहळा यशस्वी होण्यासाठी अनेक तरुणांचे व सहकार्यांचे सहकार्य लाभत असल्याचे देखील यावेळी आयोजक सुरेश भुजबळ यांनी सांगितले. यावेळी सर्व वधू वरांना आशिर्वाद देण्यासाठी श्री. श्री. श्री. शिव साईबाबा (बेंगळूर), हभप सुमंतबापू हंबीर हे उपस्थित होते. यावेळी बोलत असताना सामुदायिक विवाह सोहळ्याचे निस्वार्थीपणे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असून आत्तापर्यंत हजारो जोडपे विवाहबद्ध झाले असून अनेक कुटुंब एकत्र आली आहेत.
बाळासाहेब खैरे यांना आदरांजली
शिक्रापूर ता. शिरूर येथील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये नेहमी अग्रभागी असणारे माजी दिवंगत जिल्हा परिषद सदस्य स्व. बाळासाहेब खैरे यांची आठवण आज आयोजक सुरेश भुजबळ यांना झाली व भुजबळ यांनी बाळासाहेब खैरे व दिलीप खेडकर यांना यावेळी आदरांजली वाहिली.