महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना कर्मचारी महासंघाचे पत्र
पिंपरी ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचार्यांना धन्वंतरी योजना सोयीस्कर वाटत आहे. त्यामुळे कर्मचारी महासंघाला अगोदर विमा योजनेची सविस्तर माहिती द्यावी, त्यामुळे सर्व कर्मचारी व अधिकार्यांना विश्वासात घेतल्याशिवाय विमा योजना लागू करण्यात येवू नये, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी केली आहे.