नवापूर । शहरात दि 25 मार्च रोजी विश्व हिन्दु परिषद- बजरंग दल यांच्यातर्फ श्रीरामोत्सव समितीव्दारा भव्य शोभायात्रा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या श्री.रामोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणुन डॉ चंद्रशेखर पाटील व उपाध्यक्ष म्हणुन राजेश गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. तर शोभायात्रा व्यवस्थापक म्हणुन कमलेश जयस्वाल, अनिल दुसाने, किसन अटालिया, भटेश पाटील,संदिप दर्जी,जिग्नेश काठीयावाडी यांची निवड करण्यात आली आहे.
शोभायात्रा मार्गाची तहसिलदारांकडून पाहणी
व्यवस्थापक प्रमुख प्रशांत ठाकरे,अजित पाथरकर, अजय परदेशी, विश्वनाथ पाटील, सल्लागार व्यवस्थापक म्हणुन गुलाबसिंग वसावे,हेमंत शहा,ब्रिजेश शाह,अनंत पाटील,धमेंद्र पाटील,प्रकाश परदेशी,तर प्रसिध्दी प्रमुख म्हणुन प्रेमेंद्र पाटील,महेंद्र जाधव,जनक दलाल,योगेश सोनी,तर रथ व्यवस्थापक म्हणुन घनश्याम परमार,संजय आतारकर,संजय शिंदे,सचिन कोतकर,जितेंद्र प्रजापत ,मेहुल जोशी,अतुल प्रजापत,पिंकु पंचोली,तर मंडप व्यवस्थापक म्हणुन हिरेन शाह,योगेश शाह,सुभाष यादव,बापू देवरे,यांची निवड करण्यात आली आहे.यात विश्व हिन्दु परिषद- बजरंग दल नवापूर प्रखंड जगदीश जयस्वाल,महेश वारुळे,संजय सोनी,श्याम गावीत,निलेश देसाई,मनोज मावची, प्रितेश जयस्वाल,हर्षल ओगले,दिपक भोई, अशोक भरवाड,संदिप सुर्यवंशी,संदिप दुसाणे,संदिप पाटील,सचिन मोरे,कृणाल प्रजापत,दिपक पंचाल,विजय चंदलानी,मनिष गेही,सागर मंदाना,मिहिर जेठया,रितेश सोनार यासह वरील समितीचे पदाधिकारी सदस्य रामभक्तांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याकार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून व्यारा जिल्हा संघचालक व एकल अभियान अध्यक्ष गुजरातचे वसंत गामीत, जिल्हा मंत्री विश्व हिन्दु परिषद विजय सोनवणे,जिल्हा सहमंत्री डॉ सचिन भदाणे, जिल्हा सत्संग प्रमुख विश्व हिन्दु परिषद झुंजार पावरा, हे उपस्थित राहणार आहे. आज 20 मार्च रोजी शोभायात्रा ज्या मार्गांवरुन निघणार आहे याची पहाणी तहसीलदार प्रमोद वसावे,पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत,न.पा मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे,न.पा कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे यांनी केली. याप्रसंगी पो.का. निजाम पाडवी,पो.का. वसंत नागमल उपस्थित होते.