नवापूर । शहरात विश्व हिंदु परिषद बजरंग दल प्रखंड द्वारा आयोजित अग्रवाल भवन येथे महर्षि दधिची रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष सार्वजनिक गुजराथी हायस्कुल चे मुख्याध्यापक संजय जाधव हे होते. यावेळी मंचावर डॉ.चंद्रशेखर पाटील,राजु गावीत,डॉ.सचिन भंदाणे,राजेंद्र सोनी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची सुरवात श्रीरामाच्या मुर्तीचे पुजन करुन करण्यात आले.
रक्तदानाविषयी जनजागृती करणे आवश्यक
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय जाधव म्हणाले की, आजच्या काळात रक्तदान करणे गरजेचे आहे. रक्ताचे आवश्यकता जास्त आहे. माणसाची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. रक्तदान करण्यासाठी लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. यासाठी जनजागृती करायला पाहीजे. प्रत्येकांने रक्तदान केले पाहीजे ये प्रत्येकाचा मनात आणुन दिले पाहीजे. रक्तदान करणारा व्यक्ती हा देव असतो. रक्तदान करतांना आपल्या शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. या संघटने मार्फत 5 वर्षांपासुन रक्तदान शिबिर घेत आहेत. अवयव दान करणे ही पण काळाची गरज आहे याची ही जनजागृती झाली पाहीजे असे सांगितले. यावेळी 126 लोकांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ सचिन भदैणे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्व हिदु परिषद, बजरंग दल यांनी कामकाज पाहिले.