विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे रविवारी महारक्तदान शिबीर

0

पिंपरी चिंचवड : विश्‍व हिंदू परिषद बजरंग दल पिंपरी चिंचवड शहर विभागाच्या वतीने रविवारी (दि.28) शहरात व मावळ विभागात महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 2 नोव्हेंबर 1990 रोजी कारसेवकांवर झालेल्या गोळीबारात हौताम्य प्राप्त झालेले कोठारी बंधू आणि हजारों रामभक्तांच्या स्मरणार्थ शिबीर घेण्यात येत आहे. या शिबीरात रक्तदान करणार्‍यांनी टी शर्ट भेट देण्यात येणार आहेत, अशी माहिती बजरंग दल प्रांत संयोजक लहुजी धोत्रे यांनी दिली. गुरुवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संदेश भेगडे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल साठे, विश्‍व हिंदू परिषदेचे शहर मंत्री नितीन वाटकर, बजरंग दल शहर संयोजक नाना सावंत, सागर चव्हाण, अभिजीत शिंदे आदी उपस्थित होते.

रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन..
विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल गेल्या अनेक वर्षांपासून देशभर महारक्तदान शिबीराचे आयोजन करते. या महायज्ञात लाखों रक्तदाते उर्स्फुतपणे सहभागी होऊन रक्तदान करतात. संकलित रक्त आवश्यक त्या सैनिकांना देशभरातील मिलेट्री हॉस्पीटलला आणि गरजू रुग्णांना देण्यात येते. या महारक्तदान शिबीराअंतर्गत पिंपरी गावात सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भैरवनाथ मंदिर येथे रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

याठिकाणी होणार शिबीर….
तसेच चिंचवड – मनपा शाळा वाल्हेकरवाडी चौक आणि केंद्राई गो शाळा सुदर्शन नगर, भोसरी – सखुबाई गवळी उद्यान, मोशी – भारत माता चौक, चिंबळी – जिल्हा परिषद शाळा, चिखली – विठ्ठल रुखमाई मंदीर आणि घरकुल वसाहत, निगडी – सिध्दी विनायक नगरी, आकुर्डी – संजय काळे मैदान, कासारवाडी – गणेश मंदीरासमोर शास्त्रीनगर, थेरगाव – बोट क्लब रोड दत्तनगर, शिवमंदीर गणेश नगर, गणपती मंदीर भोरडेनगर, साई मंदीर थेरगाव गावठाण, वाकड – म्हातोबा मंदीर, पिंपळे सौदागर – महादेव मंदीर पोलिस चौकीसमोर, पिंपळे गुरव – ज्येष्ठ नागरिक संघ सुदर्शन नगर, बोपखेल – मारुती मंदीर, दापोडी – हनुमान मंदीर दापोडी गावठाण, सांगवी – नरसिंह हायस्कुल, रहाटणी – नखाते वस्ती, काळेवाडी – विठ्ठल रुख्मीनी मंदीर, इंद्रायणी नगर – मिनी मार्केट इंद्रायणी नगर, यमुनानगर – सावित्रीबाई फुले बिल्डींग, रुपीनगर – हनुमाननगर अशा सत्तावीस ठिकाणी आणि मावळ विभागात सतरा ठिकाणी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.