जळगाव । भुसावळ तालुक्यातील दर्यापूर येथील 32 वर्षीय तरूणाला विषबाधा झाल्याने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून जिल्हा रूग्णालयातच शवविच्छेदन करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, विजय सुकदेव पाटील (वय-32) रा.दर्यापूर ता. भुसावळ यांना विषबाधा झाल्याने त्यांना अत्यवस्थ वाटत असल्याने तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात शनिवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास दाखल करून उपचारास सुरूवात करण्यात आली. रविवारी सकाळी 10.30 वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे. घरातील मोठा मुलगा असल्याने कर्ता मुलगा अचानक गेल्याने नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त होत होती.