विषय समिती निवडणूक तयारी पूर्ण

0

जळगाव। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पदाधिकार्‍यांची निवड प्रक्रिया पार पडलेली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती निवडीची प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान विषय समिती सदस्य निवड बाकी असून येत्या मंगळवारी 18 रोजी सर्वसाधारण सभेनंतर ही निवड होणार आहे. आजपर्यत विषय समिती सदस्यांची निवडणुक ही बिनविरोध झाली आहे. मात्र निवडणुक घेण्याची वेळ आली तर प्रशासन त्यासाठी सज्ज असून जिल्हा परिषदेतर्फे निवडणुकीसंदर्भातील सर्व प्रक्रिया पार पडली आहे

18 रोजी होणार निवड
जिल्हा परिषदेत एकुण दहा विषय समिती आहे. स्थायी व जलव्यवस्थापन समिती महत्त्वाची असल्याने सदस्यपद मिळविण्यासाठी अनेक इच्छुक आहे. या समितीत सदस्यपद मिळविण्यासाठी अनेक दिवसांपासुन वरिष्ठ नेत्यांमार्फत सेंटींग लावली जात आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी मर्जीतील सदस्यांना या समितीत सामावुन घेतील अशी चर्चा आहे. तसेच जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवेळी भाजपाला ज्या सदस्यांनी पाठींबा दिला आहे. त्या सदस्यांचा महत्त्वाच्या समितीसाठी विचार केला जाऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. विषय समिती निवड सचिव म्हणून सामान्य प्रशासन विभाग उपमुख्यकार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी कामकाज पाहणार आहे.