जळगाव । बिडगाव येथील 34 वर्षीय शेतकर्यांने घरघुती कारणावरून राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न आज सकाळी उघडकीस आली असून उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब नथा पाटील (वय-34) बिडगाव ता.चोपडा यांनी कौटुंबिक वादातून सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास शेतपिकावर फवारण्याचे विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नातेवाईंनी रूग्णवाहिकेतून तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. आता प्रकृती स्थिर आहे.