विषारी औषध घेवून एकाची आत्महत्या

0

शहादा । तालुक्यातील दरा येथील उनबदेव रस्त्यावर शहादा शहरातील संतोष तुळशीराम वाल्हे या व्यक्तीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहीती प्रमाणे, दरा गावापासून काही अंतरावर उनबदेव रस्त्यावर सातपुडा पर्वताचा पायथ्याशी एका खोल नाल्यात संतोष तुळशीराम वाल्हे याने विषारी औषध प्राशन करुन मृतावस्थेत पडलेला होता. विशेष म्हणजे त्याने आपली मोटारसायकल क्र.(एमएच 39 क्यु 1457) ही रस्त्याचा बाजुला उभी केली होती. 28 फेब्रुवारीच्या रात्रीच त्याने आपली आत्महत्या केल्याचे समजते रस्त्याने येणार्‍या जाणार्‍याना मोटरसायकल लावलेली दिसली तर बाजुला नाल्यात मयत व्यक्ती दिसल्यांने पोलीसाना माहिती देण्यात आली. म्हसावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चौधरी यानी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा करुन रात्रीच मयताचे प्रेत म्हसावद ग्रामीण रुग्णालयात आणले होते. संजय किसन बोरसे याचा खबरीवरुन म्हसावद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. म्हसावद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन त्याचे प्रेत आज रोजी नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आले. मयत संतोष वाल्हे हा शहादा शहरातील रहिवाशी आहे. घटनास्थळी विषारी औषधाचा बाटल्या पोलीसांनी जप्त केल्या आहेत.

मानसिक तणावाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय
मयत संतोष वाल्हे हा त्याचा मेहुणा संजय बोरसे यांच्यासोबत राहत होता. संतोष वाल्हे यांची पत्नी त्याचा सोबत मोटारसायकलने जात असतांना अपघात होवुन अपघातात वारली होती. याबाबत त्याचा सासरचा मंडळीला पत्नीला मारुन टाकण्याचा संशय आल्याने त्याचे विरोधात सेंधवा (म.प्र.) येथे पोलीसात गुन्हा दाखल केलेला होता. न्यायालयात त्याचे विरोधात खटला सुरु असल्याचे पोलीसांनी सांगितले. या खटल्याचा मानसिक तणावाखाली रहात होता, म्हणून त्याने त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळवरुन त्याची मोटारसायकल जप्त केली आहे. घटनेचा तपास स्वत सहाय्यक पोलीस निरीक्षण चौधरी करत आहे. चौकशीनंतर संतोष वाल्हे याचा आत्महत्त्या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.