विषारी औषध पिऊन मायलेकाची आत्महत्या 

0
दिघी : विषारी औषध पिऊन मायलेकाने आत्महत्या केली. ही घटना डुडुडुळगाव येथील वनविभागाच्या हद्दीत बुधवारी उघडकीस आली. दरम्यान स्वखुशीने आत्महत्या करत असल्याबाबत त्यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिली असून दोघांची ओळख पटू शकली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, डुडुडुळगाव येथे फॉरबिया फार्म हाऊसच्या पाठीमागे वनविभागाच्या हद्दीत झुडपांमध्ये दोन मृतदेह असल्याची माहिती एका नागरिकाने दिघी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता एक स्त्री व एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या आसपास पाहणी केली असता त्यांच्याकडे एक चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये मी आणि माझी आई स्वखुशीने आत्महत्या करीत आहोत.  दिघी पोलीस तपास करीत आहेत.