जळगाव। मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी येथील प्रौढाने विषारी औषध प्राशन केल्याने प्रकृति अत्यावस्थ झाली होती. त्यामुळे प्रौढास जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
परंतू उपचार घेत असतांनाच काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निमखेडील येथील शामराव गणपत सुरवाडे (वय-55) यांनी सोमवारी सकाळी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांची प्रकृति खालावली. ही घटना कुटूंबियांच्या लक्षात येताच त्यांनी शामराव यांना लागलीच जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, रूग्णालयात उपचार घेत असतांनाच काही तासातच त्यांचा मृत्यू झाला. शामराव यांच्या मृत्यूची बातमी कुटूंबियांना कळताच त्यांनी रूग्णालयात आक्रोश केला. दुपारी मृतदेहावर शवविच्छेदन करून नातेवाईकांना सोपविण्यात आले.