विषारी औषध प्राशन करीत खडका येथील एकाची आत्महत्या

Suicide of a 47-year-old adult in Khadka Village भुसावळ : तालुक्यातील खडका येथील अयान कॉलनी हलीम मशिदीजवळ रहिवासी नसरोद्दीन अजीमोद्दीन शेख (47) यांनी काहीतरी विषारी प्राशन करीत आत्महत्या केली.

उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
या प्रकारानंतर त्यांना शहरातील श्री रीदम हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना शनिवार, 12 रोजी सकाळी 10.35 वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डॉ.शंतनुकुमार शहा यांनी दिलेल्या खबरीवरून बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहे.