बोदवड । बोअरवेल करण्यासाठी माहेरुन 50 हजार रुपये आणले नाही म्हणून सासरच्या छळाला कंटाळून तालुक्यातील चिखली येथील विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना 28 रोजी घडली. जळगाव येथे उपचारादरम्यान रात्री 9 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. रुख्मा मनोज पाटील हिचा पती मनोज पंडित पाटील, सासू अंजना पाटील, दिर ईश्वर पाटील, अनिता संजय वाघ (रा. पिंपळगावदेवी ता. मोताळा, जि. बुलढाणा), सिमा दिनकर अंभोरे (रा. निपाना ता. शेगाव) हे बोअरवेल करण्यासाठी माहेरहून 50 हजार रुपये आणले नाही म्हणून शारिरीक व मानसिक छळ करत त्यामुळे या नेहमीच्या त्रासाला कंटाळून रुख्मा पाटील यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांना जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरुन मयताचा भाऊ मोहन खारकर यांच्या फिर्यादीवरुन पाचही आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत रुख्मा पाटील हिस दोन मुले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सिध्दार्थ खरे करीत आहे.