विषारी औषध सेवनाने वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू

0

चाळीसगाव – विषारी औषध सेवन केल्याने तालुक्यातील बोरखेडा बु येथील ४५ वर्षीय महीला व दरेगाव येथील ५० वर्षीय ईसमाचा दिनांक १ रोजी मृत्यू झाला असुन मेहुणबारे पोलीसात अकस्मात मृत्यूच्या नोंद करण्यात आल्या आहेत. प्राप्त माहिती नुसार, तालुक्यातील बोरखेडा बु येथील ४५ वर्षीय महीला सौ कल्पनाबाई शांताराम पाटील यांनी घरात कोणी नसताना ३ दिवसांपुर्वी विषारी औषध सेवन केले होते त्यांची पुतणी दिनांक ३० रोजी घरी आल्याने त्यांना सदर घटना समजल्यावर त्यांनी कल्पनाबाई यांना चाळीसगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते उपचार सुरु असताना १ रोजी रात्री ३ वाजता त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती बोरखेडा पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांनी दिली आहे.

दुसऱ्या घटनेत तालुक्यातील दरेगाव येथे मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करण्यासाठी मध्य प्रदेश करमपुर ता सेंधवा येथुन आलेले शिवाजी जमन मोरे ५० यांनी दिनांक १ रोजी दरेगाव येथे विषारी औषध सेवन केल्याने त्यांना उपचारासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी ७-४५ वाजता आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूच्या नोंद करण्यात आल्या आहेत.तपास हवालदार भागवत पाटील व संजय पाटील करीत आहेत.