विषारी पदार्थ सेवन केलेल्या नांद्रा गावातील डॉक्टरांचा मृत्यू

जळगाव : विषारी पदार्थ सेवन केलेल्या डॉक्टरांचा बुधवारी उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. डॉ.चंद्रकांत भाऊलाल पाटील (58, रा.नांद्रा बुद्रुक) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
डॉ.चंद्रकांत पाटील यांनी राहत्या घरी विषारी पदार्थ सेवन केल्यामुळे नातेवाईकांनी सोमवार, 18 एप्रिल रोजी रात्री 8.40 वाजेदरम्यान जीएमसीत उपचारासाठी दाखल केले होते. बुधवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.