विषारी पाण्यामुळे 325 मेंढ्यांचा मृत्यू

0

रावेर । पाण्यातून विषबाधा झाल्याने सुमारे 325 मेंढ्यांच्या तळफळुन दुदैवी मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील अजंदा शेती शिवारात घडली. या घटनेमुळे मेंढपाळ कुटूंबियांचे सुमारे तीस लाखाचे नुकसान झाले आहे. दरम्यान पशु वैद्यकीय अधिकारी अजंदा येथील तरुणांनी घटनास्थळी दाखल होऊन विषबाधीत मेंढ्यांवर उपचार, मदतकार्य केले. तालुक्यातील मुंजलवाडी येथील रहिवासी मेंढपाळ लक्ष्मण डेमा शिंदे, शकंर तानु शिंदे, येलाबाई लहानु शिंदे या मेंढपाळ कुटुंबाचा वाळा अजंदे शेती शिवारात चराईसाठी अनेक दिवसां पासून मुक्कामी होते. सुमारे 1200 मेढ्यांसोबत गाई, शेळ्या नेहमीप्रमाणे सर्व चरण्यासाठी निघाल्या असता सकाळी 9 वाजेच्या सुमारास त्यांना एका शेतात साचलेले पाणी दिसल्याने सर्व मेढ्यां, गुरे हे पाणी पिण्यासाठी गेले. त्यानंतर ही घटना घडली.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी घटना स्थळी भेट देऊन मेंढपाळ कुटुंबियांचे सात्वन केले व् त्यांच्या कुटुबियांना शासन कडुन आवश्यक ती मद्त मिळवुन देण्यासाठी नाथाभाऊ, गिरीश महाजन यांच्या कडे पाठपुरावा करून प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. यावेळी तहसीलदार विजयकुमार ढगे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अध्यक्ष सोपान पाटिल, पांडुरंग पाटिल, प्रकाश पाटील आदींनी भेटी दिल्या.

पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी केले उपचार
पाणी पिल्यानंतर चराईसाठी पुढे निघाल्यानंतर अचानक काही मेढया तळफळून लागल्या व एक-एक तात्काळ मृत्यु होत होतांना. या बाबतची वार्ता प्रशासनाला लागताच पंचायत समितिचे सर्व पशु वैद्यकीय अधिकारीं घटना स्थळी दाखल होऊन बाकी मेंढयावर उपचार केले या घटनेने मेढपाळ शिंदे कुटुंबार जणु एक प्रकारचे आभाळच कोसळले होते. यावेळी फौजदार प्रवीण निकाळजे, दीपक ढोमने, हवलदार माधव पाटील, विनोद साळी, आदींनी पंचनामा केला तहसीलदार विजयकुमार ढगे घटनास्थळी तळ ठोकून होते. दरम्यान या घटनेचे वृत्त समजताच डॉ. रणजीत पाटील, डॉ.पी.पी.पाटिल, डॉ.उदय ओतारी, डॉ. फालक, सहकारी एस.बी. तायडे, मुशीर मलक, देविदास तायडे यांच्यासह मानवतेच्या दृष्टीकोनातून खाजगी पशुवैद्यकिय डॉक्टरांनी उपचार करून त्यांना पुनः जीवनदान दिले