कोईंबतुर । चेन्नईच्या विष्णूप्रसादने संमिश्र यशानंतर 20 व्या जेके टायर एफएमएससीआय राष्ट्रीय रेसिंग स्पर्धेच्या दुसर्या फेरीनंतर युरो जेके 17 मधील आघाडी कायम राखली आहे. दुसरीकडे चेन्नईच्या जोसेफ मॅथ्यूने सुद्धा चारपैकी चार शर्यती जिंकून जेके टायर सुझूकी जिक्सझर कप स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. रेड बुल रोड टू रूकी कप स्पर्धेत श्रीलंकेच्या जडेन गुणवर्धनेने आपले वर्चस्व कायम राखताना 3 सेंकदाचा फरक राखत सहज शर्यत जिंकली. पण त्याची ही कमागिरी त्याला विजेतेपद मिळवून देऊ शकणार नाही. ऐझवालचा लालह्रृोझेलाने 38 गुणांसह अजिंक्यपदाच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे.
एलबीजी फॉर्म्युला फोर स्पर्धेत धक्कादायक निकाल पहायला मिळाला. पहिल्या फेरीनंतर आघाडीवर असलेल्या चित्तेश मंडोदीने रेस वन जिंकूनसुद्धा, त्याची 15 व्या क्रमांकावर घसरगुंडी उडाली. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे चित्तेशला 30 सेकंदाचा दंड करण्यात आला. त्याचा फायदा डार्क डॉन रेसींगच्या, चेन्नईच्या संदीपकुमारला मिळाल्याने त्याचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. एमएस स्पोर्ट्सचा विष्णू दुसर्या आणि राघुल रंगास्वामी तिसर्या स्थानावर राहिला. दुसर्या शर्यतीच्या गुणपत्रिकेत डार्क डॉन रेसिंगच्या दोघा चालकांमध्ये चुरस पहायला मिळाली. त्यात होमोलोगेशनचे पालन न केल्याप्रकरणी अपात्र ठरवण्यात आलेला विजेता दिलजीत टीएसचाही समावेश होता. याशिवाय पिवळ्या दिव्याचा नियम मोडण्यात राघुल दुसर्या आणि केविन परेरा तिसर्या क्रमांकावर होता.
एलजीबी निकाल येण्यापूर्वीच विष्णूने या आठवड्यातील कामगिरी विसरायला पाहिजे असे सांगितले. विष्णूच्या खात्यात 64 गुण जमा असल्याने त्याच्याकडे असलेल्या एका गुणाच्या आघाडीसाठी त्याने समाधान मानले. पहिल्या शर्यतीत आघाडी मिळवूनसुद्धा विष्णुची डिएनएफ शेवट झाला
होता.