जळगाव – तालुक्यातील जळके येथील 45 वर्षीय प्रौढाने विषारी औषध घेतल्याचा प्रकार घडला असून खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, भिमराव प्रल्हाद पाटील (वय- 45) रा. जळके ता.जि.जळगाव यांनी राहत्या घरी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले होते. तातडीने नातेवाईकांनी खासगी वाहनाने जळगावातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. गुरूवारी 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैदयकिय अधिकारी डॉ. अमोल मोरे यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ रतीलाल पवार करीत आहे.