विष घेतलेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

0

जळगाव – कौटुंबिक कारणावरून झालेल्य वादात एका 44 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात पिक फवारणीचे विषारी औषध सेवन केले होते. त्यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी पहाटे 3.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत पोलीसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, विलास रघूनाथ पाटील (वय 44) रा. दापोरी ता.जि. जळगाव यांनी घरगुती किरकोळ कारणावरून राहत्या घरी विष घेतले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. त्याची प्रकृती अजून खालावल्याने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखले केले. रविवार 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 3.30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.