बारामती । करणी केली म्हणून कुटुंबप्रमुखाने संपूर्ण कुटुंबालाच विष प्राशन करण्यास भाग पाडले होते. यात एकाचा मुलाचा मृत्यू झाला तर त्याच्या आईची प्रकृती गंभीर होती. उपचारा दरम्यान सोमवारी तिचाही मृत्यू झाला. मुक्ताबाई चव्हाण असे तिचे नाव आहे.
26 जुलैला बारामतीतील तथाकथीत सामाजिक कार्यकर्ता विष्णु चव्हाण याने आपल्या कुटुंबियांना दर्शनासाठी वाई नजीकच्या मांढरदेवी येथे पाठविले होते. यावेळी त्याने आपल्या घरावर कोणीतरी करणी केली आहे व ही करणी संपविण्यासाठी साखरेच्या पाकात मिसळलेले विषारी औषध कुटुंबियांकडे बाटलीत देऊन पिण्यास सांगितल्याचे पोलिस तपासात उघड झाले. कुटुंबियांनी मांढरदेवीचे दर्शन झाल्यानंतर विष्णु यांची आई मुक्ताबाई पत्नी सुनिता, मुलगा स्वप्निल, मुलगी प्रतिक्षा व तृप्ती यांनी हे औषध घेतले. यामध्ये स्वप्निलचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. इतरांना सातारा व वाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान मुक्ताबाई चव्हाण यांचा मृत्यू झाला. सूत्रधार विष्णु चव्हाण हा सध्या सातारा येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.