नवापूर। स्वामीनाथन् आयोगाचा शिफारशी प्रमाणे शेती मालास उत्पादन खर्च धरुन 50 टक्के नफा मिळावा व शेतकर्यांचे विजबीलासह सरसकट कर्ज माफ करा,आदिवासी वनहक्क कायदा 2006 व सुधारणा अधिनियम 2012नुसार सर्व दावेदाखल पात्र करुन त्वरीत 7/12मिळावा व या कायद्यानुसार दावा दाखल दावेदारांचे पिक नुकसान करण्याचे वनविभागाने कृत्य केल्याबाबत सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे आज विसरवाडी येथे महा मार्गावर चक्काजाम सत्याग्रह करण्यात आला तसेच तहसीलदार प्रमेद वसावे यांना निवेदन देण्यात आल मागण्या मान्य झाल्याच पाहीजे असे मोर्चेकर्यांनी सांगुन चर्चा केली. यावेळी महामार्ग चक्काजाम होऊन नवापुरपर्यंत अनेक तास ट्रका थांबुन होत्या. अत्यंत शिस्तबध्दपणे महामार्गावर मोर्चेकरी बसुन होते. महामार्गांवर पाऊण तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी कष्टकरी ग्रामीण सभेचे महाराष्ट्र अध्यक्ष रामसिंग गावीत, रंजीत गावीत, करणसिंग कोकणी,दिलीप गावीत,मिलकाबाई वळवी,जगन गावीत,साजुबाई गावीत,सिंगा वळवी,कांतीलाल गावीत यांनी भाषणे केली.
महामार्गांवर ठिय्या
आज सत्यशोधक शेतकरी संघटेनेचा चक्काजाम आंदोलनामुळे ऩवापुर व पिंपळऩेर पर्यत वाहनांचा रांगा लागल्या होत्या. हजारो स्त्री पुरुष आंदोलनाकर्त्यांनी महामार्गांवर ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलनकर्ते काही न खाता तासभर बसुन होते उन्हाचे चटके लागत होते. अनेक जण छत्री उघडुन बसले होत. विसरवाडीचे सहायक पोलीस निरिक्षक धनंजय व नवापुर नंदुरबार येथुन पोलीसांचा फौजफाटा व होमगार्ड यांचा बंदोबस्त होता. एसटीतील प्रवासी, खाजगी वाहने, दुसर्या राज्यातील वाहने यांतील प्रवाशांचे फारच हाल झाले होते. रुग्णालयात जाणारी अँम्बुलस ही चक्काजामध्ये अडकली होती. यामुळे रूग्णांचे हाल झाले.
सरकारचा फसवा निर्णय: यावेळी शेतकरी संघटनेचा वतीने निवेदन देण्यात आले. विसरवाडी पोलीस स्टेशनचा आवरात सांयकाळी उशिरा पर्यंत चर्चा सुरु होती. सहायक पोलीस निरिक्षक धनंजय पाटील यांचा मार्गदर्शना खाली चोख पोलीस बंदोबस्त होता. सत्यशोधक शेतकरी संघटनेच्यावतीने नंदुरबार जिल्हातील विसरवाडी येथे आज सकाळी 11 वाजता सर्व शेतकर्यांचे वीजबिलासह संपुर्ण कर्ज माफ करा व स्वामीनाथान आयोगानुसार शेतमालास उत्पादन कर्ज अधिक 50 टक्के नफा मिळाला पाहीजे,या समान कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील 34 शेतकरी संघटनेचा सुकाणु समितीने महाराष्ट्रभर जनजागरण यात्रेनंतर शेतकर्यांचा मागण्या संदर्भात सरकारच्या फसव्या निर्णया विरोेधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. निवेदनावर काँ रामसिंग गावीत, काँ आर टी गावीत,काँ दिलीप गावीत,काँ कांतीलाल गावीत,काँ रमशा गावीत,काँ रणजित गावीत यांचा सह्या आहेत.
कामांचा झाला खोळंबा
अनेकांचे जिल्हा ठिकाणी असलेले काम तासभर रखडले तर नवापुर येथे व्यापारी उशिरा पोहचुन माल उशिरा पोहचला. तहसीलदार प्रमेद वसावे यांनी सकारात्क चर्चा घडुन आणली. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. पोलीस स्टेशन आवारात सांयकाळी उशिरापयर्ंत चर्चा सुरु होती. विसरवाडी,खांडबारा,चिंचपाडा,नंदुरबार नवापुर भागातुन आंदोलनात नागरिक सहभागी झाले होते. वनकायदा अंतर्गत ज्यांने दावे दाखल केले आहेत त्यांचा अंतिम निर्णय लागे पर्यत कोणत्याही अधिकार्यांनी हस्तक्षेप करु नये, पीकांची नासधुस करु नये, संपुर्ण कर्ज माफी संदर्भात लवकरच अहवाल देण्सात येईल असे कॉ. रंजीत गावीत यांनी भाषणात सांगितले.