येरवडा । विसर्जन मिरवणुकी दरम्यान काही दुर्घटना घडू नये. या उद्देशाने खराडी भागात महावितरण विभागामार्फत वीजपुरवठा सुरळीत राहावा याकरिता काळजी घेण्यात आली आहे. कर्मचार्यांनाही प्रशिक्षण देऊन अखंडीत वीजपुरवठा हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक अभियंता राहुल पालखी यांनी दिली.
पालखे म्हणाले, खराडी भागात 40 ते 50 हजार वीजग्राहक असून या परिसरात बहुतांश भागात भूमिगत केबल टाकलेल्या असल्या तरी काही भागात विद्युत पोल बसून या भागाला वीजपुरवठा करण्यात आला आहे. विसर्जनाच्या दिवशी अनेक मंडळांच्या वतीने देखावा करण्यात येतात संघर्ष चौक, खराडी चौक, थिटे वस्ती आदी भागात विद्युत पोललगत झाडांच्या फांद्या वाढल्या आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू राहत असल्याने पोलवरून केबल टाकून वीजपुरवठा केलेल्या ठिकाणी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता वीज पुरवठा खंडीत करून केबल बाजूला केली असून विसर्जन मिरवणुकीदरम्यान वीजपुरवठा सुरळीत राहावा याकरिता काळजी घेण्यात आली आहे. कर्मचार्यांना देखील वीज पुरवठा खंडीत होणार नाही. याकरिता सावध राहण्याचे आदेश दिले आहे. यामुळे महावितरण खराडी उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी समस्या सोडविण्यास तयार असतील.