विसर्जनापूर्वी रस्ते दुरुस्तीचां गणेश भक्तांना लॉलीपॉप -शिशिर जावळे यांचा आरोप

*भुसावळ* –भुसावळ शहर आणि परिसरात गणेशोत्सवाची प्रचंड लगबग सुरू आहे आणि अशातच ठिकठिकाणी भुसावळ शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर ती गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केलेली आहे . गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर खराब रस्त्यांना डागडुजी करण्याचं काम नगरपालिका प्रशासनाने गणेश उत्सवाच्या एक महिना आधीच या कामांना सुरुवात करणं अपेक्षित होत. मात्र उद्या गणपती विसर्जनाचा दिवस येऊन ठेपला असताना देखील भुसावळ नगरपालिकेने अजून पर्यंत देखील कॉलेज बायपास ब्रिज पासून ते अमर स्टोअर्स पर्यंत जामनेर रोडवरील बऱ्याच ठिकाणी असलेले प खड्डे अजूनही पूर्णपणे बुजलेले नाहीत. या मार्गावरून सुद्धा शहरातील जामनेर रोडच्या आजूबाजूच्या परिसरातील गणपती विसर्जन मिरवणुका जात असतात. गणेशोत्सवा पूर्वी पंधरा दिवसांच्या आधी संतोषी माता हॉलमध्ये झालेल्या गणेश मंडळाच्या बैठकीत भुसावळ शहरातील विसर्जन मिरवणुकीतील रस्त्यांबाबत चा मुद्दा मी सभागृहात मांडला होता . त्यात गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या पूर्वी विसर्जन मिरवणूक मार्ग असू देत किंवा गणपती मंडळांच्या परिसरातील रस्ते व त्यावरील खड्डे बुजवण्यात येतील अशा आश्वासन नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व गणेश भक्तांना त्या बैठकीत दिलेलं होतं. मात्र उद्या विसर्जनाचा दिवस येऊन ठेपलेला असताना देखील आज पावितो सुद्धा जामनेर रोडवरील खड्या अजून पर्यंत बुजवलेले नाहीये खड्ड्यांची दुरुस्ती केलेली तसेच भुसावळ शहरातील प्रभाग 22 मध्ये भली मोठी चार प्रसिद्ध गणेश मंडळ आहेत त्यामुळे या मंडळाच्या लगतच्या रस्त्यांवरुन संतोषी माता हॉल समोरील रिंग रोड ते भिरुड हॉस्पिटल पर्यंत या मार्गावरून यातील काही मंडळ गणेश विसर्जन मिरवणूक जातात. तसेच घरगुती गणपती मंडळ सुद्धा या मार्गावरून नेले जातात. या मार्गावर विसर्जनाच्या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे हि मोठे मोठे खड्डे दाबलेले नाहीत . रस्त्यांना डाग डुजी केलेली नाही. त्यामुळे अशा या सुस्त नगरपालिका प्रशासनाचा साई निर्मल फाउंडेशन श्री नमो विचारमंच जाहीर निषेध व्यक्त करत आहे . भुसावळ नगर पालिकेकडून एक प्रकारे रस्त्यांची खड्डे बुजवून रस्ता सपाटीकरण करू असं खोटं आश्वासन देण्यात आलेल असून एक प्रकारे सर्व जनतेला आणि गणेश भक्तांना लॉलीपॉप,लाडू , गाजर सर्व देण्यात आलेल आहे. पावसाचं कारण पुढे सांगून जाणून बुजून ही काम अपूर्ण ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळें असे खोटे आश्वासन देउन एक प्रकारे जनतेला लाँलीपॉप दिला असल्याचा आरोप श्री नमो विचार मंच चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे केलेला आहे.

 

शिशिर दिनकर जावळे