सांगवी : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे, तरी पण परिसरातील गणेश विसर्जन घाटाची साफसफाई करण्यात आलेली नव्हती. नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी याची दखल घेतली. तातडीने महापालिका आरोग्य विभागास संपर्क साधुन देवी आई माता व दत्त मंदिर घाट, नदी पात्र परिसर तसेच बाकी सर्व घाट साफ सफाई करण्याबद्दल आरोग्य विभागाला सूचना दिल्या. यानुसार घाट परिसर साफ सफाई कामास सुरुवात केली आहे. आपण सर्वच गणपती बाप्पाचे थाटात स्वागत करतो. कोणी एक दिवस तर कोणी दहा दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची पुर्ण श्रद्धेने, सेवाभावाने सेवा करतो मग बाप्पांना निरोप देतांना सुद्धा तेवढ्या थाटात, स्वच्छ वातावरणात गणपती बाप्पांचे विसर्जन झाले पाहिजे. या भावनेतून भाजपच्या दोन्ही नगरसेवकांनी तातडीने आरोग्य विभागास विसर्जन घाट व नदी पात्र साफसफाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.