जळगाव । मंगळवारी मंगळांतर्फे शहरातून विसर्जन मिरणुका काढत बाप्पाला निरोप देण्यात आला. या मिरवणुकांमध्ये गर्दीचा फायदा घेत मात्र, भामट्यांनी हात साफ केले आहेत. यात भामट्यांनी पाच मोबाईलसह दोन मोटारसायकली आणि एका रिक्षातून बॅटरी चोरून नेली आहे. याबाबत पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार देण्यात आली आहे. कोर्ट चौकापासुन ते घाणेकर चौक या दरम्याना चोरीच्या घटना घडल्या आहेत.
यांचे मोबाईल चोरी; पोलिसात तक्रार
शहरात मंगळवारी बाप्पाला निरोप देण्यासाठी मंडळांतर्फे ढोपताश्यांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. रात्री उशिरपर्यंत शहरात मिरवुणका सुरू होत्या. त्यामुळे गणेश भक्त मिरवणुकातील आरास तसेच ढोल-ताशे पाहण्यासाठी शहरात आले. त्यामुळे मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची प्रचंड गर्दी उलटली होती. याचाच फायदा घेत चोरट्यांनी मिरवणुकांमध्ये चोरीचा डाव साधला. चोरट्यांनी मिरवणुकी पाहण्यासाठी आलेल्या प्रशांत हेमंत जुवेकर (रा.द्रोपदीनगर), भरतसिंग रामसिंग परदेशी (रा.जळगाव), अमर राजु पवार (रा. मेस्कोमातानगर), निलेश रमेश कोळी (रा. हरिओमनगर), नितीन गजानन साळुंखे (रा. शाहुनगर) यांच्या खिशातून महागडे मोबाईल चोरून नेले. विशेष, म्हणजे या पाचही भाविकांची मोबाईले चोरट्यांनी टॉवर चौक परिसरातून लांबविली आहे.
दोन मोटारसायकली लंपास
विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी गेंदालाल मिल येथील अजय सुरेश सोनवणे हे त्यांच्या मोटारसायक (एमएच.19.एके.7029) ने आले होते. शहरात वाहनांना एंन्ट्री नसल्यामुळे अजय यांनी अमर चाट भांडारच्या मागील गल्लीत मोटारसायकल उभी करून मिरवणुक पाहण्यासाठी निघुन गेले. मात्र, रात्री परतल्यानंतर त्यांना त्यांची मोटारसायकल चोरीला गेल्याची दिसून आले. यातच गुरूदत्त कॉलनी येथील भुषण प्रकाश नेवे हे देखील विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी आल्याने त्यांनी मोटारसायक (क्रं.एमएच.19.बीएस.0328) ही जे.के.पान सेंटरजवळ उभी केली होती. परंतू मिरवणु पाहूण आल्यानंतर त्यांना देखील त्यांची मोटारसायकल जागेवरून गायब झाल्याची दिसून आली. यानंतर दोन्ही मोटारसायकस्वारांनी शहर पोलिस स्टेशन गाठत याबाबत तक्रार नोंदविल्या आहेत.
रिक्षातून बॅटरी चोरी
विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी भाविकांची मंगळवारी रात्री प्रचंड गर्दी झाली होती. यातच रेल्वे स्टेशन परिसरात ईश्वर दगडु कोळी रा. अडावद यांनी रिक्षा क्रं. एमएच.19.बी.जे.6934 ही उभी केली होती. मात्र, मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी रिक्षातून बॅटरी चोरून नेली आहे. याबाबत ईश्वर कोळी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. तसेच विसर्जन मिरवणुकांमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला आहे. शहरात सध्या गेल्या काही महिन्यांपासून भुरट्या चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये घट होतांना दिसत होते. मात्र, पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढले आहेत. त्यामुळे चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत.