विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलिसांना मिळाला ‘घरचा डबा’

0
संवाद युवा प्रतिष्ठानतर्फे राबविला उपक्रम
पिंपरी : गणेशोत्सवापासून ते विसर्जन होईपर्यंत कायम ‘ड्यूटीवर’ असणार्‍या पोलिसांना कोणत्याच सण समारंभ साजरे करायला मिळत नाहीत.मिरवणूक शांततेत पार पडावी, कोणतेही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस आपल्या घरादारापासून लांब असतात. सणवार परिवारासोबत साजरे न करता सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी रात्रं-दिवस खडा पहारा करणार्‍या पोलीस बांधवांना जेवणा-खाण्याचेही हाल होत असतात. अशा जनरक्षकांप्रती समाजाचेही काही कर्तव्य असते हे जाणून संवाद प्रतिष्ठानने हा उपक्रम हाती घेतलेला आहे.
अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये जागृत राहून खर्‍या अर्थाने गणेशोत्सवास निर्विघ्नपणे पार पाडणार्‍या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व पोलिसमित्रांना ‘घरचा डबा’ देण्याचा संकल्प संवाद युवा प्रतिष्ठाणच्या समन्वयकांनी पार पाडला.
याप्रसंगी चिंचवड पोलीस चौकीचे वरिष्ठ निरिक्षक प्रभाकर शिंदे तसेच औताडे यांच्या निर्देशानुसार भरित-पुरीचे डबे व पाण्याच्या बाटलीचे वाटप केले. संवादचे सर्व समन्वयक प्रदिप पटेल, रामचंद्र पाटील, रविंद्र कुवर, राजेंद्र निकम, माऊली जगताप, प्रल्हाद पाटील, गौतम बागूल, भगवान निकम, सचिन महाले, किरण महाजन, विशाल वाणी, प्रविण महाजन, किशोर बागूल उपस्थित होते. या संवाद संस्थेचे मनोबल उंचावण्याकरिता नगरसेवक नामदेव ढाके, शेखर चिंचवडे, भाजपा व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष राजाभाऊ चिंचवडे, ब प्रभाग स्विकृत सदस्य बिभिषण चौधरी, कामगार नेते शंकर पाटील, समजसेवक विजय पाटील, रेखा भोळे, कमलाकर गोसावी, तानाजी गाडे, महेंद्र पाटील, सचिन काळभोर, मोहन भोळे, विभाताई व गौरीताई आदी उपस्थित होते.